कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना समोर आली आहे. आठवडाभरात रेल्वेवर दगडफेकीची ही तिसरी घटना आहे. बरोसाई रेल्वेस्थानकाजवळ वंदे भारत सी-14 डब्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे खिडक्मयांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यामुळे सोमवारी एक्स्प्रेस बोलपूर स्थानकात बराच वेळ थांबवावी लागली. सुदैवाने या दगडफेकीत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे.
30 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये पहिल्या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवला होता. चार दिवसांनंतर 2 जानेवारीच्या रात्री मालदा येथे ‘वंदे भारत’वर दगडफेक करण्यात आली. कुमारगंज रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या दगडफेकीत सी-13 कोचच्या गेट आणि खिडकीचे नुकसान झाले. त्यानंतर आणखी दोनवेळा दगडफेकीची घटना घडल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.









