रत्नागिरी प्रतिनिधी
चालत्या टेनमध्ये प्रवाशाच्या डोक्यावर दगड पडून जखमी झाल्याची घटना 30 मे रोजी घडली.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अब्दुल मजिद अबु बकर काडबेन (55, मूळ रा. केरळ सध्या रा. माहिम-मुंबई) हे तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने जात होते. खिडकीत बसलेले असताना रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या अलिकडे निवसरनजीक अचानक एक दगड जोरात त्यांच्या डोक्यावर पडला. यात डोक्याला खोप पडून त्यातून रक्त वाहू लागले. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गाडी येताच तातडीने रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. जखम इतकी मोठी होती की, त्यांच्या डोक्यावर डॉक्टरांनी टाके घातले. दरम्यान अब्दुल मजिद अबु बकर काडबेन मुंबईतील माहिम येथे एका किराणा मालाच्या दुकानात गेली 34 वर्षे काम करत आहेत. या कामानिमित्त मुंबईला जात असताना हा अपघात घडला. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.