Stomach Gas Home Remedies : बऱ्याच जणांना थोड जरी जादा खाल्लं की पोटाचा त्रास सुरु होतो. किंवा पोटात गॅस होतो. गॅस होण्याची समस्या जर तुम्हाला सतत होत असेल तर तुम्हाला महागडे उपचार घेण्याची गरज नाही. घरच्य़ा घरी तुम्ही काही उपाय करून या त्रासापासून सुटका मिळवू शकता.
गॅसपासून मिळवा अशी मुक्तता
-हर्बल चहाच्या सेवनाने पोटातील गॅसपासून त्वरित आराम मिळतो. तुम्ही पुदिना, आले किंवा कॅमोमाइल चहाचे सेवन करू शकता.
-जिरे आणि बडीशेपचा चहा पोटातील गॅसची समस्या दूर करू शकतो. तुम्ही असा चहा बनवून पिऊ शकता.
-अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन करू शकता. एका ग्लासमध्ये सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून तुम्ही पिऊ शकता. सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये फायबर असते त्यामुळे ते पोटातील गॅस कमी करण्यास मदत करते. तुम्ही याचे सेवन रिकाम्या पोटी करू शकता. या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
या गोष्टी खाऊ नका
चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात गॅस तयार होतो. या प्रकरणात, धूम्रपान करू नका. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारातून अल्कोहोल काढून टाकले पाहिजे. गॅस असेल तेव्हा च्युइंगमचे सेवन करू नका
टीप – या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









