सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील मौजे समर्थनगर येथून एका खाजगी कंपनीच्या बेस कॅम्पमधून 17 हजार रुपये किमतीचे एकूण पाच पॅरागोल्ड कंपनीची कॉपर केबल वायरचे बंडल अज्ञाताने चोरून नेले होते. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी कामगार शंकर भानुदास देवदास यास 24 तासाच्या आत शोध घेऊन जेरबंद केले आहे.. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या वायरचे बंडल आणि चोरीमध्ये वापरलेली मोटरसायकल असा एकूण 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.









