पाचगाव वार्ताहर
Kolhapur Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने भारती नगर,मोरेवाडी तालुका करवीर येथे शनिवारी छापा टाकून दोन लाख 76 हजार साठ रुपयांचे गोवा बनवटीचे मद्य जप्त करण्यात आले.
भारती नगर,मोरेवाडी येथे गोवा बनावटीचे विदेशी मद्यसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि करवीर पोलीस यांनी भारती नगर येथे छापा टाकला. यावेळी गोवा राज्यात विक्री करता व महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेले गोवा बनावटीचे विदेशी मध्ये जप्त करण्यात आले.या छाप्यामध्ये एकूण 32 बॉक्समध्ये 750 मिलीच्या एकूण 384 काचेच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या छाप्यामध्ये एकूण दोन लाख 76 हजार 60 रुपयांचे विदेशी मद्य ताब्यात घेण्यात आले असून संशयित आरोपी अनिकेत पाटील हा फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज कुंभार, करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली आर जी येवलुजे, एस एस गोंदकर, मुकेश लाडके,सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव,योगेश शेलार,गणेश सानप,सविता देसाई,अश्विनी मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बांगर,प्रमिला माने यांनी कारवाईत भाग घेतला. यावेळी मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश पवार, अजित तिवले उपस्थित होते.










