नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडियाच्या समभागात बीएसईवर सोमवारी 5 टक्के इतकी वाढ दिसून आली. सदरच्या कंपनीचा समभाग सोमवारी शेअर बाजारात 5 टक्के वाढत 9.42 रुपयांवर पोहचला होता. कंपनीने अलीकडेच लघुमुदतीच्या कर्जाची 2700 कोटीची रक्कम एसबीआयकडे भरली आहे. याचा परिणाम कंपनीच्या समभागावर दिसला. बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 29,774 कोटी रुपयांनी वाढले आहे.