टाटा मोर्ट्सचा नवा विक्रम : सेन्सेक्स दुसऱ्या सत्रात 159 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात दुसऱ्या सत्रात मंगळवारी चढउताराच्या प्रवासामुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. प्रारंभीच्या काळात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत झाले होते, परंतु बाजार जसजसा सावरत गेला तसे बाजाराने आपली गमावलेली तेजी पुन्हा मिळवत बाजारावर नियंत्रण प्राप्त केले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर 159.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 63,327.70 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला एनएसई निफ्टी 61.25 अंकांनी मजबूत होत निर्देंशांक 18.816.70 वर बंद झाला आहे.
या क्षेत्रांची चमक :
मंगळवारी सर्व क्षेत्रांचा निर्देशांक हा वधारुन बंद झाला आहे. यामध्ये पॉवर क्षेत्राचा निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. तसेच वाहन, रियल इस्टेट, धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्सचे समभाग हे सर्वाधिक तेजीसोबत बंद झाले आहेत. यावेळी कंपनीचे समभाग हे 3 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच पॉवर ग्रिडकॉर्प ,एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एनटीपीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी वधारुन बंद झाले.
या व्यतिरिक्त अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, टायटन आणि एचडीएफसी आदीचे समभाग तेजीत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि स्टेट बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीजचा आयपीओ
कंपनी एमएमए अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी खुला झाला आहे. रिटेल गुंतवणूकदार हा आयपीओ 20 जून ते 23 जून पर्यंत अर्ज सादर करु शकतात. तसेच 4 जुलै रोजी भारतीय शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात समभाग लिस्ट होणार आहे. यामुळे या घटनेचाही काय परिणाम होणार हे आगामी काळात पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.









