नवी दिल्ली
स्टरलाईट टेक्नॉलॉजी कंपनीला अलीकडेच 250 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. स्टरलाईटने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत कंत्राटासंबंधी करार केला आहे. ऑप्टिकल आणि डिजिटल सोल्युशन प्रदान करणारी स्टरलाइट टेक्नॉलॉजी ही कंपनी डाटा सेंटर सुविधेसह इतर सुविधा प्रदान करते. कंत्राटाअंतर्गत मिळालेले कामाचे कंत्राट कंपनीला 3 वर्षात पूर्ण करावे लागणार आहे. सदरच्या बातमीनंतर स्टरलाइट टेक्नॉलॉजीच्या समभागांमध्ये 8 टक्केपर्यंत उसळी दिसली आहे.









