Sterilization of dogs through Pure Animal and Sawantwadi Municipality–
मुंबई येथील प्युअर अॅनिमल संस्था आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या माध्यमातून शहरतील दाेन हजार कुत्र्यांची ऑक्टोबर महिन्यापासून नसबंदी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना वाढत्या कुत्र्यांपासून होणारा त्रास लक्षात घेता कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहेत.माजी नगराध्यक्ष अनाराेजिन लोबाे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्युअर ॲनिमलच्या निधी सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, पालिकेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर , रसिका नाडकणीॅ, माजी नगरसेविका दिपाली सावंत, भारती मोरे, शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, आदी उपस्थित होते.
पालिका फंडातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. संस्था शंभर कुत्र्यांचे मोफत नसबंदी करणार आहे. रोटरी क्लब व इनरव्हील क्लब, युवक मंडळे आदी सामाजिक संस्थांनी या उपक्रमाचा भाग घ्यावा आम्ही आर्थिक मदतही करावी असे आवाहन लोबो यांनी केले आहे.तर 28 सप्टेंबर पासून कुत्र्यांना रेबीज ची लस देण्यात येणार आहेगोव्यातील एका संस्थेमार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे रसिका नाडकर्णी यांनी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नाडकर्णी यांनी केले
सावंतवाडी / प्रतिनिधी









