कुपवाड पोलिसांची कारवाई
कुपवाड / प्रतिनिधी
कानडवाडी येथे गोडाऊन बांधकामासाठी आणलेल्या लोखंडी सळ्यांची चोरी केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील चोरी करण्यासाठी वापरलेल्या वाहनासह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक केलेल्यांमध्ये संशयित विकास दत्तू घाडगे (वय ३४,रा.बुधगाव), सोनू गिरधारी कुमार (वय ४०), विनयकुमार दशरथ बिंद (वय २४, दोघेही रा.दत्तनगर, बामणोली. मूळ गाजीपूर, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात दिपक श्रीपाल खोत (रा.राणाप्रताप चौक, कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे.









