इंजेक्शनच्या सुविधेमुळे गेल्या तीन वर्षांत सत्तरीतील 80 रुग्णांना जीवदान : वाळपई येथील विशेष मेळाव्यात काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन
प्रतिनिधी /वाळपई
हल्लीच्या काळात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील आरोग्य खात्यातर्फे ‘स्टेमी’ इंजेक्शनची ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात 2018 साली या सुविधेचे उद्घाटन केले होते. गेल्या तीन वर्षांत या सुविधेमुळे हृदयविकाराच्या झटक्मयातून एकूण 80 जणांचे प्राण वाचल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. यामुळे ही सुविधा हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर असून यातून अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती वाळपई सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम काणकोणकर यांनी दिली.
यावषी 80 जणांचे प्राण वाचले आहेत. असा रुग्णांचा विशेष मेळावा नुकताच वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना आहारावर कशा प्रकारे नियंत्रण राखता येईल व येणाऱया काळात कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी, या संदर्भात वाळपई सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱयांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत वाडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, सुमित कलबुर्गी, जिया कदम, सावियो गोन्साल्विस, तन्वी आचरेकर, निकिता नाईक, शालिनी मंडल, सोनाली तानावडे आदीसह इतरांची उपस्थिती होती.
सरकारने ‘स्टेमी’ ही चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेतून सत्तरी तालुक्मयातील एकूण 80 जणांचे प्राण वाचविण्यास महत्त्वाचे मदत झाली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना स्टेबल करण्यासाठी विशेष इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनातून रुग्णाची स्थिती सीमित राहते व त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी योग्य वेळ मिळतो. इंजेक्शनची किमत बाजारपेठत रु. 50 हजारांहून अधिक आहे. मात्र सरकारने ग्रामीण स्तरावर या इंजेक्शनची सुविधा उपलब्ध करून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचेही डॉ. श्याम काणकोणकर यांनी स्पष्ट केले.
ज्या रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळाला, त्यांचे आरोग्य आज स्थिर आहे. यामुळे येणारी अनेक वर्षे ते चांगल्या प्रकारे जगू शकतात, असे डॉ. वाडकर यावेळी म्हणाले.
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लाभदायक!
कोपार्डे येथील आपा च्यारी यांनी सांगितले की, स्टेमी इंजेक्शन उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला नवसंजीवनी प्राप्त झाली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्याला इंजेक्शन दिले होते. तेव्हापासून आपली प्रकृती अत्यंत समाधानकारक आहे. कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्यावर झालेले नाहीत. सरकारने हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील हृदयविकाराच्या रुग्णांसाठी खुपच लाभदायक ठरत आहे.
मोठय़ा संकटातून वाचलो!
मासोर्डे सत्तरी येथील वासुदेव गावस म्हणाले, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्याला वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दिलेल्या इंजेक्शनमुळे आपण या मोठय़ा संकटातून बाहेर पडलो. आतापर्यंत माझ्या प्रकृतीवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. यामुळे या इंजेक्शनचा आपल्याला माझ्या आरोग्याला चांगला लाभ झाला.
अनेक रुग्णांना जीवदान!
मलपण सत्तरी येथील बाबू झोरे म्हणाले, वाळपई सारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयात ‘स्टेमी’सारख्या मोठय़ा रकमेचे इंजेक्शन उपलब्ध केल्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले.









