विनोद सावंत,कोल्हापूर
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण होणार या आशेवर महापालिका प्रशासन जुनी शिंगणापूर योजना तसेच आऊडेटेड झालेल्या उपसा केंद्रावर खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे.मात्र,आठ वर्ष झाली तरी थेटपाईपलाईन योजना रखडलेलीच आहे.यामुळे ‘थेटपाईपलाईन काही पूर्ण होत नाही आणि शिंगणापूर योजनेतील गळती काही थांबत नाही’.अशा विचित्र स्थितीमुळे शहरातील पाणीपुरवठा वारंवार बंद होत आहे.प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे.
कोल्हापूर शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेची मागणी झाली.थेटपाईपलाईनसाठी निधी मिळत नसल्याने तात्पुरता पर्याय म्हणून शिंगणापूर योजना मंजूर करून आणली.ही योजना गळकी योजना ठरली.वारंवार गळती काढण्यामुळे पाणीपुरवठा बंद होत आहे. शिंगणापूर,नागदेववाडी आणि बालिंगा या तीन उपसा केंद्रात 40 वर्षापूर्वीची यंत्रणा आहे.ही यंत्रणा आऊटडेड झाली असल्यानेच वारंवार पंपात बिघाड,मोटर शॉर्ट होते.परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
जुनपर्यंत तरी थेटपाईपलाईन पूर्ण होणार का?
थेट पाईपलाईन अंतिम टप्प्यात असल्याने जुन्या यंत्रणेवर मनपाने खर्च करणे टाळले आहे.मात्र,थेटपाईपलाइंनचे इंटेक वेल,इन्फेक्शन वेल,बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईन कामे अपूर्णच आहे.सर्व काम पूर्ण झाल्यानंतर टाकलेली पाईपलाईन किमान तीन वेळा वॉशआऊट करावी लागणार आहे.त्यामुळे जुनपर्यंत तरी थेटपाईपलाईन योजनेचे काम पूर्ण होणार काय असा प्रश्न आहे.
स्टँडबायचा पंपच दुरूस्त होईना
शिंगणापूर उपसा केंद्रातील यापूर्वी 4 पंपातून उपसा होत होता.तर 1 पंप स्टँडबाय होता.सध्या 4 पैकी 1 आणि स्टँडबायचा 1 असे दोन पंप बंद पडले आहेत. 2 पंपावर पूर्ण क्षमतेने उपसा होत नाही.त्यामुळेच शहरावर पुन्हा पाणी संकट आले असून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की आली आहे.
नदी उशाला कोरड घशाला
कोल्हापुरातील धरणे-नदी फुल्ल आहेत.मात्र,शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती झाली आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे पाणीपुरवठा विभागाकडे झालेल्या दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. वेळीच खराब मशिनरी, जुन्या पाईपलाईन बदलेल्या असत्या आणि मोटर, पंप स्पेअरला ठेवले असते. तर ही वेळ आली नसती, हे वास्तव आहे.
थेटपाईपलाईनवर अतिविश्वास धोक्याचा
काळम्मावाडी धरण ते पुईखडी अशी 55 किलोमीटरवरून पाईपलाईन आणली आहे. 27 किलोमीटरवरून जॅकवेलसाठी विद्युतलाईन आणली आहे. जॅकवेल धरण क्षेत्रात उभारले आहे. यामध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे स्टँडबाय म्हणून जुनी यंत्रणा सुस्थिती ठेवणे आवश्यक आहे. शिवाय शहरातील अंतर्गत पाईपलाईनही जुन्या आहेत. त्यामुळे थेटपाईपलाईनने शहराचा पाण्याचा प्रश्न मिटणार असे म्हणणे सध्या तरी योग्य होणार नाही.
शिंगणापूर योजनेची स्थिती
योजना कार्यन्वीत झालेले वर्ष-2000
खर्च -72 कोटी
पाणीपुरवठा-60 एमएलडी
पाईपलाईन-सिमेंटची
थेटपाईपलाईन योजना
एकूण निधी मंजूर -488 कोटी
वर्कऑर्डर -22 ऑगस्ट 2014
पाचवी वाढीव मुदत-31 डिसेंबर 2022 पर्यंत
पाणीपुरवठा करण्याची क्षमता-230 एमएलडी
पाईपलाईन -एमएस पाईप्स (स्पारयल वायडींग)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









