मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी 4 जूनला आनावरण
पेडणे : पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गावर आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याहस्ते पुतळ्याचे स्वागत करून नंतर मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत वाजत गाजत लेझिम मिरवणूक काढून रविवार दि. 28 मे रोजी सकाळी वारखंड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उत्साही वातावरणात आगमन झाले. यावेळी वारखंड-नागझर सरपंच गौरी जोसलकर, उपसरपंच वसंत नाईक, पंचायत सदस्य देविदास च्यारी, माजी सरपंच मंदार परब, श्री शांतादुर्गा सांस्कृतिक क् क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अमित परब, राजू सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग परब, अनंत परब, देवस्थान समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, मुकुंद परब उपस्थित होते. श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघ वारखंड यांच्यातर्फे वाराखंड पंचायत इमारत आणि श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्या पुतळा 13 फ्tढट उंचीचा आहे. कोल्हापूर येथील कारागीराने तो बनविला असल्याचे श्री शांतादुर्गा सांस्कृतिक व क्रीडा संघाचे अध्यक्ष अमित परब यांनी सांगितले. रविवार दि. 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमित परब यांनी केले आहे.









