कोल्हापूर / प्रतिनिधी
देशातील १०८ उद्योगांमधील खाजगी सहकार निमसरकारी क्षेत्रातील निवृत्त कामगारांना पेन्शन वाढ व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी देशाचे पंतप्रधान यांना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्याचा निर्णय निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने घेण्यात आला होता या अनुषंगाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन(महसूल) उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी स्वीकारून सदरचे निवेदन पंतप्रधान भारत सरकार यांच्या कार्यालयास पाठवण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, कार्याध्यक्ष भिमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, सचिव प्रकाश पाठक यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय सदस्य शिवाजी सावंत शिवाजी देसावळे समन्वयक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा बँक संघटनेचे नेते वसंतराव पाटील कोल्हापूर जिल्हा सह. दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील उपाध्यक्ष शामराव पाटील, एम.टी. डोंगळे, दिलीप जोशी, शंकरराव चौगुले, शामराव चौगुले, बाळू पोवार यासह पेन्शनर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर येथे जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना शिवाजी देसावळे शिवाजी सावंत दिलीप पाटील,दिलीप जोशी,एम. टी. डोंगळे शंकर चौगुले के. डी. पाटील, शामराव पाटील व अन्य कार्यकर्ते









