कुंभोज प्रतिनिधी
कुंभोजसह परिसरातील गंगोत्री टेक्स्टाईल लिमिटेड आळते मधील कामगार व महिलावर्ग यांचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले यासाठी संदेश भोसले यांचे सहकार्य लाभले.
कुंभोज सह परिसरातील कामगार हे गंगोत्री टेक्स्टाईल लिमिटेड आळते या कंपनीमध्ये 2014 ते 15 या सालापर्यंत काम करत होते. अचानकपणे बंद केल्या मुळे फंड बोनस पगार सर्विस या आर्थिक बाबीची पूर्तता न करता मनोज टिब्रेवाल यांनी कंपनी बँकेच्या ताब्यात दिली. या कंपनीचा सध्या ताबा जे के स्पिनर्स यांनी घेतला आहे. तरी फंड बोनस पगार सर्विस लवकर मिळावे अशी मागणी या निवेदनाद्वारे कुंभोज सह परिसरातील कामगारांनी केले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिल्यानंतर तात्काळ कारवाई करावी असे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले या निवेदनावर कामगारांच्या सह्या आहेत.









