बेळगाव प्रतिनिधी – बेळगाव शहर तसेच जिल्ह्यात मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात त्यांना मराठीत परिपत्रके देणे कायद्याने बंधनकारक आहे महानगरपालिकेवर मराठी फलक लावावा मराठीत परिपत्रके द्यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगरसेवकांनी आली आहे.
माजी महापौर नगरसेवक निवेदन देण्यासाठी आले होते, मात्र अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुरगुंडी यांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव मध्ये मराठी भाषिक 22 टक्के पेक्षा अधिक आहेत, घटनेनुसार त्यांना मराठीतून परिपत्रके देणे बंधनकारक आहे, असे सांगण्यात आले जर परिपत्रके, फलक मराठीतून देण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे.
http://iew Post https://tarunbharat.com/ratnagiri-action-against-gamblers-tbdnews/
यावेळी माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, माजी महापौर महेश नाईक,माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, मालोजी अष्टेकर, किरण सायनाक, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, ॲड. रतन मासेकर, मोहन बेळगुंदकर, गणेश ओवूळकर, गजानन पाटील, सुधा भातकांडे, माया कडोलकर, मोहन भांदुर्गे, नगरसेवक राकेश पलंगे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.