► प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटवरील बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्याला 10 वर्षे उलटून गेली, हे बॅरिकेड्स काढावेत यासाठी आजवर शेकडो निवेदने दिली. शिवाय पंतप्रधान कार्यालयापासून स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला. अद्याप हे बॅरिकेड्स काढण्यात आले नाहीत. आता तरी हे बॅरिकेड्स काढावेत, असे निवेदन बॅरिकेड्स हटाव संघटनेने भाषिक अल्पसंख्याकाचे संचालक शिवकुमार यांना दिले आहे.
या निवेदनात बॅरिकेड्सने आजपर्यंत केलेल्या पत्रव्यवहारांचा उल्लेख आहे. बॅरिकेड्समुळे लोकांना होणाऱ्या गैरसोयीची माहिती देण्यात आली आहे. बॅरिकेड्स काढून येथे वाहतूक पोलीस नेमावेत व आम्हाला बॅरिकेड्सच्या गुलामगिरीतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सुभाष घोलप, रणजित नाईक, विजय कामकर, मनोहर रोकडे, रणजित हावळाणाचे यांच्यासह अनेक नागरिकांनी हे निवेदन दिले आहे.









