युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे सावंतवाडीत प्रतिपादन
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्यात आपण महायुती म्हणून एकत्र आहोत. मात्र महायुतीमध्ये कुठलेही आपापसात वाद असता कामा नये. आपण सर्व एकत्र आहोत आणि सर्वत्र एक म्हणून राहायचे आहे. आपल्याला पक्ष संघटना वाढवायची असून हे करत असताना आपल्याच मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपण आपला पक्ष वाढवणे उचित नाही . याबाबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊ नये अशी जी भूमिका घेतली आहे त्याचे आम्ही युवासेना स्वागत करत आहोत. सर्व महायुती एकत्र आहे मात्र आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , उबाठा शिवसेना या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश द्या आणि पक्ष संघटना वाढवा असे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी महासचिव राहुल लोंढे ,सचिव किरण साळी ,राम राणे ,जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, अर्चित पोकळे. सोनाली पाटकर ,मेहुल धुमाळे ,प्रतीक सामंत आदी उपस्थित होते . यावेळी श्री सरनाईक पुढे म्हणाले .आता युवा सेना संपूर्ण राज्यात कॉमन मॅन म्हणून काम करणार आहे आणि ते आमचं स्लोगन आहे. आम्ही आता कॉमन मॅनचा सन्मान करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 63. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात 65, कणकवली विधानसभा मतदारसंघात 60 अशा एकूण जवळपास 180 कॉमन मॅनचा पुढील पंधरा दिवसात सन्मान केला जाणार आहे. तसा उपक्रम आम्ही राबवणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे ,सचिव किरण साळी ,राम राणे, जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, जिल्हाप्रमुख प्रतीक सामंत, हर्षद पारकर ,युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर , सावंतवाडी शहर प्रमुख अर्चित पोकळे.,श्री पोकळे प्रतीक बांदेकर, निखिल सावंत ,श्री मेस्त्री,प्रीतम गावडे ,राकेश सावंत ,स्वप्निल गावडे मेहुल धुमाळे,आदी उपस्थित होते.









