डिगणेच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौ शैला नाडकर्णी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी
बांदा
डिगणे ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करेन, तसेच गावातील महिलांसाठी रोजगाराभीमूख योजना गावात कशा राबवता येईल याकडे लक्ष देईन. मी उपसरपंच म्हणून काम करत असताना सर्वाना एकत्र घेऊन गावच्या विकासासाठी काम करीन आणि शासनाच्या विविध योजना मी सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचवेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच सौ शैला प्रविण नाडकर्णी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केले.नुकतीच डिगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शैला नाडकर्णी यांची निवड झाली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक, जयेश सावंत, आदेश सावंत, आरोही गवस, ऋतुजा नाईक, ग्रामसेवक सुवर्णा वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश सावंत, वृषाली सावंत, विनायक नाईक, पौर्णिमा कदम, निकिता सावंत आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच शैला नाडकर्णी यांना माजी सरपंच रोहित नाडकर्णी, सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









