बेळगाव प्रतिनिधी – उत्तर प्रदेशमध्ये दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला . या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हमारा देश संघटना व भीम क्रांती युवक मंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, मल्लिकार्जुन कोकणी,संदीप भिडे,लक्ष्मीकांत कोटगी, देवदत्त मांजरेकर, सचिन इनामदार व भीम क्रांतीचे युवक मंडळाचे लक्ष्मण कांबळे, कृष्णा तळवार, निखिल कोलकार, राहुल वाघोकर, रमेश कोलकर, यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









