44 तक्रारी नोंद, मोठय़ा प्रमाणात सामान जप्त
प्रतिनिधी /पणजी
गणेश चतुर्थी तोंडावर आली असता विविध प्रकारच्या समानांचे बाजार कचाकच भरलेले आहेत. अशास्थित अनेक विक्रेते बेकायदेशीर रित्या समानाची विक्री करून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करीत असतात. त्याच्यावर आळा बसावा म्हणून वजन माप खात्याने रविवारी संपूर्ण गोवाभर बेधडक कारवाई केली आहे. एकूण 44 तक्रारी नोंद केल्या असून मोठय़ा प्रमाणात समानही जप्त केले आहे.
वजन माप खात्याने नोंद पेलेल्या 44 तक्रारीमध्ये दक्षिण विभागात 15 उत्तर विभागात 18 तर मध्य विभागात 11 तक्रारी नोंद केल्या आहेत. अशी माहिती वजन माप खात्याच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
वजन माप खाते कायदा 2009 तसेच पाकीटबंद वस्तू नियम 2011 नुसार या कारवाया करण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या पाकीटबंद वस्तूंवर, ती वस्तू कधी बंद केली आहे, वापरण्याची शेवटची तारीक, त्याची किमंत अशाप्रकारची माहिती असणे गरजेचे असते. तशी माहिती नसल्यास ती वस्त बेकायदेशीर ठरवून विक्रेत्यावर कारवाई केली जाते.
तक्रारी नोंद केलेल्या पाकीटबंद वस्तूमध्ये आवश्यक माहिती न केलेल्या वस्तू त्यात फटाके, ब्लूतूत स्पिकर, मोबाईल सामान, ड्राय फ्रूटस् बंद पाकीट, या सारख्या वस्तूंचा समावेश आहे. तर अमंल बजावणी तक्रारीत फळे, भाजीपाला व अन्य काही वस्तूंचे व्यवस्थित माप करून देत नसल्याचा ठपका ठेऊन कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
सालसेत आणि मुरगाव तालुक्याच्या वजन माप खात्याचे निरीक्षक भुपेंद्र देसाई, मडगाव 1 चे निरीक्षक अझेन रॉड्रीग्स, मडगाव 2 चे निरीक्षक विकास खांडोळकर, यांनी दक्षिण विभागाचे सहाय्यक नियंत्रक नितीन पुरूशान यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण विभागात कारवाया केल्या आहेत.
वजन माप खाते म्हापसा 1 चे निरीक्षक सिद्देश शिरगावकर, म्हापसा 2 चे निरीक्षक केशवराज गोवेकर, वजन माप खाते पेडणे निरीक्षक आदित्य परब, यांनी वजनमाप खाते डिचोली कार्यालयाचे सहाय्यक नियंत्रक गुलाम गुलबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभागात कारवाया केल्या आहेत.
मध्ये विभागात वजन माप खात्याचे निरीक्षक सतीश गावस, रजत कारापूरकर, विकास खांडोळकर यांनी सहाय्यक नियंत्रक देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाकाली कारवाया केल्या आहेत.









