राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद स्वत: पंतप्रधान मोदी यांनी सन्मानाने दिले असल्याचे सांगून पुढील निवडणूक देखील एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वात लढवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे लोकांच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे विधान करून उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष लक्ष केले आहे.
कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्रीपद मागितला होता का? मुख्यमंत्रीपदावर फक्त शिवसेनेचा हक्क आहे असं पंतप्रधानांनी स्वतःहून सांगितलं होतं. आम्ही जर शब्द दिला आहे तर तो शिवसैनिकांसाठी आम्ही पाळू. मात्र तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आम्ही देणार नाही. त्यांनी आम्हाला सन्मानाने मुख्यमंत्री पद दिले. तसेच पुढील निवडणूक देखील एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वात लढवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरही केला आहे. यामुळे दुसऱ्यांच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही.” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादीची भाकरी जर अजित पवार फिरवत असतील तर ते शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय फिरवू शकणार नाहीत. त्यांच्या पक्षावर वक्तव्य करण्यासाठी मी त्यांचा प्रवक्ता नाही.” असे ते म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी “मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतःच्या तब्येतीला जपला पाहिजे. ते रोज पहाटेपर्यंत काम करतात त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होईल. यामुळे राज ठाकरे यांनी दिलेल्या सल्ला हा वेगळ्या अर्थाने घेणे आवश्यक आहे. सिंहासनावर बसून राज्य करायचं हे आता चालणार नाही राज्यात लोकशाही आहे. स्वतःचे जोडे पुसून घेण्याची संस्कृती त्यांना आवडत असेल तर ते त्यांनी जपावी आम्ही ती जपणार नाही. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जोडे पुसले जाऊ लागले त्यावेळी आम्ही उठाव केला आहे.” अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे गटावर केली.