सांगली :
माजी मुख्यमंत्री पद्मभुषण कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र रायफल शुटिंग क्लब शांतिनिकेतनतर्फे राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन २ मार्च रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक गौतम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, या स्पर्धा १९ वर्षांखालील मुले, मुली तसेच खुल्या गटातील पुरुष आणि महिला विभागामध्ये एअर रायफल, एअर पिस्टल, ०.२२ रायफल, १२ बोअर गन, रिव्हॉल्वर/पिस्टल, बिग बोअर रायफल या प्रकारात होणार आहेत.
दरवर्षी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यातील नामांकित शुटर्स सहभागी होत असतात. यंदाही विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल, रोख रक्कम अशी बक्षीसे दिली जाणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा,








