त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत
आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर
भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे डॉ मनमोहन सिंग यांना आपण मुकलो आहोत. देशाच्या अर्थकारणाचा पाया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रचला. सामान्य माणसाला आधार देण्याचा अर्थकारण मनमोहन सिंग यांनी केलं. काँग्रेसच्या बेळगाव मधील कार्यकारणीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. भविष्यकाळात कोणत्या दिशेने जायचं त्याबद्दल थकून चर्चा यामध्ये झाली. महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाचे आत्मपरीक्षण केलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली.
पुढे ते म्हणाले, या सगळ्याचा अभ्यास प्रदेश काँग्रेस म्हणून आम्ही करत आहोत. सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्या पद्धतीने राज्याला पुढे घेऊन जाण्यासंदर्भातले प्रयत्न दिसत नाहीत. बीड मधील घटना कल्याण मधील घटना परभणी मधील घटना घडली. बदलापूरच्या घटनेनंतर देखील राज्याचे गृह खाते सुधारलेले दिसत नाही. कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिली आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. राज्याचे अर्थकारण बिघडलेला आहे शिक्षकांचा पगार वेळेवर होतो की नाही अशी शंका आहे. या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण अशी झाली आणि त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रश्नावर कुणाचीही गय केली जाणार नाही असं म्हटलं आहे आता महाराष्ट्राची जनता कारवाई काय होते याची वाट बघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा नेमका कुणाकडे होता हे आता आपण पाहूया. कुणालाही सोडणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. विधिमंडळामध्ये बीडचे प्रकरण परभणीचे प्रकरण असेल या सगळ्यावर चर्चा झाली मात्र सरकार म्हणून काही भूमिका घेतली आहे हे आम्हाला दिसले नाही. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सतेज पाटील यांनी दिली.
Previous Articleगैरप्रकाराला थारा देणाऱ्या कॅफेंवर कारवाई
Next Article सीए परीक्षेत कोल्हापूरच्या 22 विद्यार्थ्यांचा झेंडा








