आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : सत्तरी तालुक्मयात महा आरोग्य शिबिराला सुरुवात
वाळपई : ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये रक्त तपासणीची यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पेट स्कॅनिंग (झ्Tिं एण्Aऱ्) ही नवीन यंत्रणा येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे त्याचा गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. सत्तरी तालुक्मयातील प्रत्येक पंचायत क्षेत्रातील 14 महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नुकताच केरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. देविया राणे, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, जि. पं. सदस्य देवयानी गावस, सरपंच दीक्षा गावस, संचालिका डॉ गीता काकोडकर, संयोजक विनोद शिंदे, डॉ. गीता देशमुख, डॉ. उत्तम देसाई डॉ अतुल पै. बीर, डॉ. ऊपचंद नावेलकर, भिवा गावस, तन्वीर पांगम, डॉ. केदार नाईक, उस्मान सय्यद, नंदिता गावस, श्रीपाद गावस, संदीप ताटे, राजेश गावस, सोनिया गावकर, सुप्रिया गावस यांची खास उपस्थिती होती. आरोग्यमंत्री राणे पुढे म्हणाले, आतापर्यंत गोव्यातील जनतेला कर्करोग सारख्याच्या रोगांच्या निधनासाठी उपचारासाठी मुंबई सारख्या शहरात जावे लागत होते. मात्र ही सुविधा लवकरच गोव्यामध्ये उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पेट स्कॅन ही अत्याधुनिक सुविधा गोमेकॉ कार्यरत करण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू असून येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
गोवा मेडिकल कॉलेज व आरोग्य संचालनालयाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य खात्याचे कर्मचारी परिचारिका, डॉक्टर्स चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी भागाप्रमाणे सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असून दरवषी गोवा मेडिकल कॉलेज व आरोग्य खात्यातर्फे 120 कोटींची मोफत औषधे विकत घेतली जातात. गोवा हे एकमेव राज्य असून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मोफत औषधे देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे गोमंतकीयांसाठी चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत असतात अशी यावेळी ते म्हणाले.सध्या सत्तरी तालुक्मयात अशा प्रकारच्या महा आरोग्य शिबिर उपक्रम चालू केलेला आह. आगामी काळात गोव्याच्या सर्व भागांत अशा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी अशा शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दृष्टीने चांगला लाभ होत असल्याचे सांगितले. गोमेकॉचे तज्ञ डॉक्टर अशा शिबिरामध्ये जनतेसाठी सेवा देत आहेत. आरोग्य जनतेच्या दारापर्यंत अशी नवी संकल्पना आरोग्य खात्याने सुरू केली आहे. याबद्दल त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. अशा शिबिरांचा ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांनी यावेळी बोलताना प्रत्येकाने वेळेवर आपल्या आरोग्याची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी बोलताना अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ऊग्णांच्या रोग निदानासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यांना एक विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र देण्यात येणार असून त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी अशा शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. सरपंच दीक्षा गावास यांनी स्वागत केल. सूत्रसंचालन डॉ. वैभव गाडगीळ यांनी केले. डॉ. अतुल पै बीर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात केली भागातील नागरिकांनी उपस्थिती लावून तपासणी करून घेतली.









