वेंगुर्ले (वार्ताहर)-
भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी येथे निमंत्रित १५ संघांच्या ‘राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या दांडिया स्पर्धेसाठी चित्रपट व मालिका नृत्य व नाट्य दिग्दर्शक व कला दिग्दर्शक सागर बगाटे हे परीक्षक असणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख ११ हजार ५५५ रुपये, ७ हजार ५५५ रुपये, ५ हजार ५५५ रुपये व उत्तेजनार्थ दोन क्रमांकास प्रत्येकी २ हजार ५५५ तसेच सर्व विजेत्यांना चषक अशी पारितोषिके, इतर सहभागी संघांना प्रवास खर्च १ हजार रुपये देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वसंत तांडेल- ९४२२४३६६३६ व जयंत मोंडकर-९४२२३९३८८२ यांच्याशी संपर्क साधावा. लाभ घ्यावा, असे आवाहन विशाल परब मित्रमंडळ व भाजपतर्फे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.









