State Level Swimming Competition at Vijaydurg
श्री दुर्गामाता कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग आणि जिम स्वीम अकॅडमी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धा २०२२ स्पर्धेचे 4 थे वर्ष… विजयदुर्ग – वाघोटन खाडीवर, दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी 5 किमी मुली – मुलगे, 3 किमी मुली – मुलगे, 2 किमी मुली – मुलगे तसेच मास्टर जलतरणपटू, 1 किमी मुली – मुलगे आणि 500 मीटर मुली – मुलगे अशा 10 गटांमध्ये जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री आनंद माने, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट व सांगली जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत करिता मुख्य पंच म्हणून सातारा जिल्हा जलतरण संघटनेचे श्री सुधीर चोरगे यांनी काम पाहिले तर स्पर्धा निरीक्षक कैलाश आखाडे, पंच बालाजी केंद्रे, सतीश कदम, गंगाराम बर्गे यांनी काम पाहिले.
या भव्य स्पर्धेचे आयोजन जिम स्विम अकादमी कोहापुरचे अजय पाठक यांनी व श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्गचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, खजिनदार श्री रविकांत राणे, कार्याध्यक्ष प्रथमेश धुरी, परशुराम धुरी, तुषार पडेलकर, भावना पोसम, गीतांजली पाटील, रसिका राणे, तसेच मंडळाचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच मेडिकल चे डॉक्टर चव्हाण सर व त्यांचे सहकारी टीम यांचे देखील खूप मोलाचे सहकार्य लाभले. गाबित समाज सभागृह, विजयदुर्ग येथे बक्षीस समारंभ मंडळाचे अध्यक्ष, जिम स्वीम चे मुख्य पाठक सर, मुख्य परिक्षक, स्पर्धा परीक्षक आणि उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.
देवगड / प्रतिनिधी