ज्युडोपटूना प्रोत्साहन तसेच डोंपीग बाबत मार्गदर्शन करणार
बेळगाव : अॅम्युचर ज्युडो असोसिएशन बेळगाव आयोजित पहिल्या कर्नाटक राज्य खुल्या ज्युडो स्पर्धाला शनिवार दि. 25 रोजी गांधी भवन येथे प्रांरभ होत आहे. या स्पर्धेत राज्यातील जवळपास 400 ज्युडोपटू भाग घेत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ज्युडो क्रीडा प्रशिक्षक व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली.
गांधी भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत उद्घाटनप्रसंगी लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग, निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश मुरगोड, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, युवजन क्रीडा अधिकारी श्रीनिवास बी, अभिजीत यु, मि. इंडिया सुनील आपटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी राज्य ज्युडो संघटनेचे पदाधिकारी नागराज पाटील, मुरली मोहन, जितेंद्र सिंग मलप्रभा जाधव, रोहिणी पाटील, कुतुझा मुलतानी,त्रिवेनी सिंग, हर्षित राव,रवी कुमार, मिथुन डीबी, कोमल हलगेकरसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत विविध जिह्यातील वयोमर्यादित विविध गटातील खेळाडू उपस्थित राहणार आहेत. या सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची सोय संघटनेतर्फे करण्यात आली आहे. बेळगावात प्रथमच राज्यस्तरीय खुल्या ज्युडो स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेचा सर्व खेळाडूनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









