सावंतवाडी / प्रतिनिधी
दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन; कोरिओग्राफर मंदार काळे, गणेश बालचिम उपस्थित राहणार…
State Level Group Dance Competition in Sawantwadi on 7th through Onkar Kalamcha
ओंकार कलामंचाच्यावतीने चालविणार्या जाणार्या डान्स अॅकेडमीच्या ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबईतील कोरिओग्राफर मंदार काळे आणि गणेश बालचिम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर व कोरिओग्राफर अनिकेत आसोलकर यांनी दिली. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्यूत सावंत-भोसले, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. तर बक्षिस वितरणासाठी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेेली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संजू परब, आणी अॅड. अनिल निरवडेकर उपस्थित राहणार आहेत. येथील पालिकेच्या भोसले उद्यानाच्या समोर ही स्पर्धा होणार आहे .
यावेळी अॅकेडमीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पंधरा दिवसाच्या शिबीरातील विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई येथील कोरिओग्राफर मंदार काळे आणि गणेश बालचिम हे उपस्थित राहणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ८ हजार, द्वितीय पारितोषिक ४ हजार आणि तृतीय पारितोषिक २ हजार व ट्रॉफी तसेच, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त संघानी या नृत्य स्पर्धेत सहभागी व्हावे असे, आवाहन मंचाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी ९४२२९०८८५३ या नंबरवर संपर्क साधावा.









