State Level Creation Literary Lifetime Achievement Award to Literary Ram Mistry
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अप्पर कोषागार अधिकारी व कोकणचे सुपरीचीत कथाकार ज्येष्ठ साहित्यिक राम मेस्त्री यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंच सरवडे तर्फे कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय सृजन गौरव पुरस्कार सोहळ्यात सृजन साहित्य जीवन गौरव पुरस्कार सन 2022 प्रदान करण्यात आला. पुरोगामी विचारवंत मा. आमदार संपत बाबू पवार- पाटील कोल्हापूर यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे प्रदान करण्यात आले . याप्रसंगी व्यासपीठावर लेखक महेश काणेकर, बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट समवेत राम मेस्त्री यांच्या सुविद्य पत्नी निवृत्त राजपत्रित अधिकारी सौ अनुराधा मिस्त्री नातू चिरंजीव आदिराज दिग्विजय मेस्त्री उपस्थित होते. राम मेस्त्री यांची प्रदीर्घ साहित्य कारकीर्द राहिली असून विविध नियतकालिके आकाशवाणी आणि पुस्तक रुपी त्यांचे विविध साहित्य प्रकाशित व प्रसारित झालेले आहे. राम मिस्त्री यांनी आजवर सुमारे 30 पुस्तकांचे लेखन केले असून त्यातील सुमारे 18 ते 20 पुस्तके आजवर प्रकाशित झालेली आहेत कथा लघुकथा कविता ललित लेख वैचारिक लेखक कादंबरी पर्यटन कृषी गौरव ग्रंथ नमुनाट्य लोकनाट्य एकांकिका नाटक विभूती कथा महापुराण अशा विविध साहित्य प्रांगणात राम मिस्त्री यांनी अत्यंत समर्थपणे संचार केल्या आहे. सुमारे 100 गटांचे दहा कथासंग्रह लिहिण्याचे भाग्य त्यांना मिळाले असून त्यांच्या साहित्याला कोकणी मातीचा गंध असून वास्तववादी लेखन ही त्यांची गुणवत्ता आहे .
प्रतिनिधी डिगस









