कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील आमदारांचा निधी कमी केल्यावरून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिरसंधान सोडले आहे. त्याला आता चंद्रकांत पाटील सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. “पुणे जिल्ह्याची काल नियोजन मंडळाची बैठक झाली. पुण्यातील स्थगिती असलेल्या ३०३ कोटींची कामे सुरु केली. यापूर्वी इतर आमदारांपेक्षा जास्त निधी घेणाऱ्यांमध्ये अजित पवार यांनी ८० कोटी, दिलीप वळसे पाटील ४० कोटी, अण्णा भरणे ४० कोटी, इतका निधी घेतला होता. तर इतर आमदारांना १०-१५ कोटी निधी दिला होता. जास्त असणाऱ्यांचा निधी मी निम्मा केला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. “अजित पवारांनी त्यांची सत्ता असताना त्यांच्या आमदारांना न्याय द्यायला पाहिजे होता. पुर्वीच्या सरकारने अव्वाच्या- सव्वा घेतलेल्या निधी आम्ही कमी केला. अजित पवारांनी त्यांच्याच आमदारांना आवळा दिला, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका करत निधीवरून मी राजकारण करणार नाही. सर्वाना समान निधी देण्याचे काम मी केले आहे.” असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार तरूणांना नोकरी देण्याचा मानस व्यक्त केला. आपल्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना ते म्हणाले, “राज्यात ६ ठिकाणी महारोजगार कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार तरुणांना नोकरी देण्याचा सरकारचा मानस असून मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरात १० लाख नोकऱ्यांचा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानस असल्याचेही मंत्री चंत्रकांत पाटील यांनी सांगितले.
गुजरात निवडणूकीवरून बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, भाजप नेहमीच एखादी निवडणूक एक युद्ध आहे असे समजून लढते. आम्ही एकजुटीने त्याला सामोरे जातो. गुजरातमध्येच नाही तर देशात कुठंही निवडणूक असेल त्याठिकाणी आम्ही सगळे मिळून लढतो. महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश याठिकाणी देखील आम्ही सर्व नेते मिळून लढतो. यामध्ये काही नवीन नाही” असेही पाटील म्हणाले.
Previous Articleमच्छे-परिसरात 5 वीकेंडला वीजपुरवठा खंडित
Next Article लिपीक भरती आता MPSC मार्फत








