सांगे : देशाचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत सांगे भाजपतर्फे साजरी करण्यात आली. वाजपेयी यांची जयंती सुशासनदिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेला सुशासन देण्यासाठी कार्यरत आहे. लोकांना सुलभपणे आणि जलद गतीने सेवा मिळावी म्हणून अनेक सेवा डिजिटल केल्या आहेत, याकडे यावेळी बोलताना फळदेसाई यांनी लक्ष वेधले. वाजपेयी यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे असून देश आणि जनसेवेला त्यांनी प्राधान्य दिले, असे सांगून त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून फळदेसाई यांनी अभिवादन केले. यावेळी सांगेच्या नगराध्यक्षा प्रीती नाईक, माजी नगराध्यक्ष संजय (आबुली) रायकर, नगरसेवक इक्बाल सय्यद, निखील तारी, दीपक नाईक, प्रसाद नाईक, पंढरीनाथ कर्पे इत्यादी हजर होते.
Previous Articleसेंत्रु प्रोमोतोरच्या शतकमहोत्सवाचा समारोप
Next Article फोंडा शहरातील अंतर्गत नाल्यांची सफाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









