काही दिवसापुर्वी रत्नागिरीमध्ये हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री मदत निधीतून 10 लाख रुपये आणि इतर योजनातून 15 लाख रुपये दिले जाण्याची मंजूरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची अशी घोषणा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच शशिकांत वारिशे यांच्या मुलालाही शासकिय सेवेत घेणार असल्याचे सांगितले.
कोकणातील वादग्रस्त ग्रीनफिल्ड रिफायनरी प्रकल्पाविरोधात पत्रकार शशिकांत वारीसे लिहल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पंढरीनाथ आंबेकर या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारिसे यांच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून 10 लाख रुपये आणि इतर योजनांकडून 15 लाख रुपये दिले जाणार आहेत.तसेच वारिसे यांच्या मुलाला सरकार नोकरीही देणार आहे.” असे ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य शासनाने वारीसे यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाला (एसआयटी) निर्देश दिले असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवले जाईल असे घोषित केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








