वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कब•ाr असो. च्या विद्यमाने दि. 23 ते 27 फेब्रु या कालावधीत 35 व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड (जि. नाशिक) येथील श्री. गुरू गोविंद सिंह हायस्कूल शेजारील हॅलीपॅड मैदानावर मॅटच्या 4 क्रीडांगणावर हे सामने खेळविले जातील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा किशोर व किशोरी गटाचा संघ निवडण्यात येईल. हा निवडण्यात आलेला संघ काश्मीर येथे होणाऱ्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जिल्हा संघाना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले किशोरी (मुली) गटाचे संघ 22 फेब्रु. रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होतील याची दक्षता घ्यावी. त्याच दिवशी सर्व संघांची छाननी केली जाईल. 23 व 24 या दोन दिवसात साखळी व उप उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामने खेळविले जातील. तसेच किशोर (मुले) गट संघानी 24फेब्रु. रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपली उपस्थिती राखावी. त्यांची छाननी त्याच दिवशी करण्यात येईल. मुलांचे सामने 25 व 26 या दोन दिवसात खेळविण्यात येतील. दोन्ही गटाचे उपांत्य व अंतिम सामने 27 फेब्रु. रोजी सायंकाळच्या सत्रात खेळविण्यात येतील. तीस वर्षांनंतर मनमाडला हे सामने पुन्हा होत आहेत. सर्व खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था गुरुद्वारामार्फत करण्यात आली आहे.









