Maharashtra News : राज्यातील प्रलंबित असलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकांचा कालावधी वाढवण्यात आलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत प्रशासकच कार्यभार पाहतील.
राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारी तसेच ओबीसी राजकीय आरक्षण आणि सत्ता बदलाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. राज्य सरकारच्या निर्णयाने कोल्हापूर मनपासह जिल्हा परिषद प्रशासकांचा कालावधी वाढलाय . राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर मनपासह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सहा नगरपरिषदांची निवडणूक लांबणीवर पडलीय .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








