प्रतिनिधी / बेळगाव
गणेश विसर्जन झाल्यानंतर आता कपिलेश्वर तलावातील गणेशमूर्ती महापालिका काढून विधिवत पूजन करून तलाव स्वच्छ करत आहे. यावर्षी मोठ्या मूर्ती असल्यामुळे त्या काढताना कसरत करावी लागत आहे. मंगळवारी या कामाला महापालिकेने सुरुवात केली आहे.
कपिलेश्वर येथील दोन्ही तलावांमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन केले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्यामुळे त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाहीत. त्यामुळे त्या मूर्ती काढून तलाव स्वच्छ करावा लागत आहे. मंगळवारी या कामाला सुरुवात करण्यात आली. अजूनही दोन दिवस हे काम चालणार आहे.
कपिलेश्वर तलावाबरोबरच आता जक्कीनहोंड तलावाचीही स्वच्छता केली जाणार आहे. एकूणच महापालिका या कामाला लागली आहे. तलावातून मूर्ती काढून वाहनांमधून नेण्यात येत आहेत









