आमच्या समाजात माणसाला सर्वप्रथम त्याच्या लुक्सद्वारे जज केले जाते. कुणी जाड, कुणी सडपातळ, छोटा किंवा उंच किंवा कुणाच्या डोक्यावर केस आहेत की नाही हे पाहिले जाते. त्यानंतरच लोक संबंधिताविषयी स्वत:चे मत तयार करत असतात. याचमुळे लोक स्वत:च्या लुक्सवर पैसा खर्च करत असतात, तसेच लवकरच ते हीनभावनेचे शिकारही होत असतात.
कमी वयात केस गळू लागल्यास माणूस चिंतेत पडतो, परंतु केरळच्या अलापुझा येथे राहणाऱ्या एका इसमाने स्वत:च्या टक्कलाद्वारे पैसे कमाविण्याची शक्कल लढविली आहे. 36 वर्षीय शफीक हाशिम एक ट्रॅव्हल व्लॉगर असून तो अलापुझाच्या करूर येथील रहिवासी आहे. कमी वयातच त्याच्या डोक्यावरील केस गळू लागले होते. कॉलेजमध्ये त्याची चेष्टा केली जायचे, यामुळे शफीकने हेयर ट्रान्सप्लांट करविण्याचा विचार केला, तो हे करणार देखील होता, परंतु अचानक त्याचे मन बदलले. त्याने स्वत:च्या टक्कलाला स्वीकारले आणि याचा पैसे कमाविण्यासाठी वापर करण्याचा विचार केला. आता तो स्वत:च्या डोक्यावर जाहिराती प्रकाशित करवितो आणि त्याला याच्या बदल्यात पैसे मिळतात.
शफीक हाशिमने स्वत:च्या टक्कल पडलेल्या डोक्याला जाहिरातीसाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. त्याला या कामासाठी 50 हजार रुपये मिळतात. त्याला याकरता स्वत:च्या डोक्यावर क्लायंटच्या प्रॉडक्टचा टेम्परेरी टॅटू 3 महिन्यांसाठी राखावा लागतो आणि तो जितके व्लॉग तयार करेल, त्यात हा टॅटू दिसत राहतो. त्याने सोशल मीडियावर स्वत:ची ही कहाणी मांडत टक्कल पडलेल्या लोकांना प्रोत्साहित केले आहे.









