बेळगाव प्रतिनिधी – देशातील एक विकसनशील शहर म्हणून बेळगावची ओळख आहे. व्यापारी दृष्ट्या बेळगाव हे महत्त्वाचे शहर असल्याने बेंगळूर – बेळगाव या मार्गावर दररोज नागरिकांची ये – जा असते. त्यामुळे या मार्गावर हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. खासदार मंगला आंगडी यांनी शुक्रवारी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून रेल्वे स्थानकाचे उद्घाटन व बेळगाव धारवाड नव्या रेल्वेमार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती राहण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. बेळगाव – बेंगलोर या मार्गावर दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात अनेक उद्योजक व्यापारी नोकरदार या दोन शहरा दरम्यान प्रवास करत असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यास प्रवासाचा वेळ कमी होणार असून विकासाला चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली. या मागणीला आलेले मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन