2011 पासून देशात जनगणना झालेली नाही, भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात बऱ्याच दिवसांपासून रखडलेली जनगणना लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जनगणना यावषी सप्टेंबरमध्ये सुरू होईल आणि ती पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 महिने लागतील. देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते परंतु कोविडमुळे 2021 मधील जनगणना प्रक्रिया होऊ शकली नाही. हे काम आता पूर्ण होणार आहे. देशात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती.
देशात पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये जनगणना सुरू झाल्यास हे सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 महिने लागतील. साहजिकच मार्च 2026 पर्यंत जनगणनेची आकडेवारी येऊ शकतात. यावेळी जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. देशातील नागरिकांना स्वत:ची माहिती नोंदवण्याची संधी मिळणार आहे. जनगणना प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे त्याच्यात अचूकता दिसून येणार आहे.









