मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची सर्व खाते सचिवांना सूचना : वेळापत्रकाद्वारे कामे मार्गी लावा,आढावा घेण्यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक
पणजी: नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प 2023-24ची तातडीने कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व खाते सचिवांना दिले असून कार्यवाहीचे सविस्तर वेळापत्रक तयार करा, अशी सूचना केली आहे. या अर्थसंकल्पात 25 ते 30 टक्के जास्त महसूल प्राप्त होणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे. शिवाय गेल्यावर्षी पेक्षा चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कमीत कमी कर्ज घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. सावंत यांनी काल सोमवारी सर्व सरकारी खाते सचिवांची बैठक घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली. त्याची कार्यवाही कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. अर्थसंकल्पातील योजना, तरतुदी यांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही त्यांनी बजावले आहे. नवीन सुधारणा कऊन प्रशासकीय पद्धतीने पुढची वाटचाल करावी, असेही डॉ. सावंत यांनी सूचवले आहे.
संपूर्ण वेळापत्रक तयार करा
अर्थसंकल्पातील योजना कोणत्या महिन्यापासून सुऊ होणार? तसेच विकासकामांची पायाभरणी कधी होणार? आणि त्याचे उद्घाटन कधी करणार? असे संपूर्ण नियोजन करण्यात यावे व तसे वेळापत्रक ठरवावे, असेही डॉ. सावंत यांनी खाते प्रमुखांना सूचित केले आहे. अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या प्रथम सोमवारी खाते सचिवांची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
महसूल वाढीसाठी प्रयत्न करणार
ते म्हणाले की, 2022 मध्ये महसुलात 30 टक्के वाढ झाली. त्यासाठी महसूल खात्याने ऊ. 600 कोटींचे लक्ष्य ठेवले होते. ते पार कऊन ऊ. 900 कोटीचा महसूल प्राप्त झाला. जीएसटीचे ध्येय ऊ. 800 कोटीचे होते ते ऊ. 1000 कोटी मिळाले. आता चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ऊ. 40 कोटीचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. महसुलात वाढ व्हावी म्हणून सर्व ते प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकसाठी जमेची बाजू
अर्थसंकल्प 2023-24 मधील ध्येय प्राप्त करण्यासाठी डॉ. सावंत यांनी आता खाते सचिवांना कामाला लावले असून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. आता खाते सचिव खाते प्रमुखांकडे ती जबाबदारी देऊन त्यांच्याकडून काही कामे कऊन घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्च 2023 च्या अखेरीस डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्प 2023-24 विधानसभेत सादर केला असून त्याची कार्यवाही करण्यासाठी लगेच चालू एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खाते सचिवांना जागे केले आहे. डॉ. सावंत यांना अर्थसंकल्पातील तरतुदींची कार्यवाही तातडीने करण्याचे वेध लागले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ती भाजपाकरीता जमेची बाजू ठरणार आहे. डॉ. सावंत यांचा पुढील अर्थसंकल्प मार्च 2024 मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर किंवा आसपास सादर होणार असून तत्पूर्वी 2023-24 अर्थसंकल्पाचा कृती अहवाल सादर करावा लागणार आहे. तो 100 टक्के सादर करता यावा यासाठी डॉ. सावंत हे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.