सातारा :
सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अलिकडच्या काही वर्षामध्ये सातारा नगरपालिका गणेशोत्सवामध्ये विसर्जन काळात निर्माल्य संकलित करुन त्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया केली जाते. याही वर्षी निर्माल्य संकलित केले असून त्यापासून खत निर्मितीला प्रारंभ झाला आहे. ही खत निर्मिती राजवाडा येथील छ. प्रतापसिंह महाराज भाजी मार्केट येथील खत प्रकल्पात सुरु आहे. सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीने पुढे असून वाहतूक शाखेने निर्माल्य पोहचवले आहे.
सातारा नगरपालिकेने विसर्जन तळ्याच्या ठिकाणी स्वतंत्र निर्माल्य कुंड ठेवले होते. त्या ठिकाणाचे सर्व निर्माल्य कुंडातील संकलित केलेला निर्माल्य वाहतूक शाखेने श्री. छ. प्रतापसिंह भाजी मंडईत पोहच केला. तेथे त्यातील सर्व श्रमिक कचरा वेचकच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक बाजूला केले. निर्माल्य बाजूला केले.
ते निर्माल्य खत तयार करण्यासाठी पिटमध्ये टाकून खत निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अलिकडच्या काळात हा उपक्रम राबवत असते. आरोग्य विभागचे प्रमुख राकेश गालियाल यांनी यामध्ये लक्ष घातले होते.
गणेशोत्सव काळात गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन करण्यासाठी तात्पुरती निर्माल्य कलश करण्यात आली होती. गणेश विसर्जनस्थळी निर्माल्य संकलन करण्यासाठी ट्रॉली उभी केली होती आणि सातारा पालिकेची योद्धा गाडी निर्माल्य संकलन करण्यासाठी ठेवली होती निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती छ. प्रतापसिंह महाराज भाजी मार्केट येथील खत प्रकल्पात करण्यात आली आहे. आजअखेर ९ ट्रॉली व ११ योद्धा गाडी निर्माल्य संकलन करण्यात आले असून या निर्माल्या पासून सेंद्रिय खत निर्मिती सर्व कचरा वेचक श्रमिक संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.








