वंचित बहुजन आघाडीने विमानतळ अधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोकुळ शिरगाव/वार्ताहर
कोल्हापूर विमानतळावर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा अखंडितपणे आठवड्यातील सातही दिवस नियमित सुरू करण्यात यावी. कोल्हापूर मुंबई विमानसेवेसाठी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून अनेक महिन्यांपासून सदर विमानसेवा बंद आहे यामुळे कामानिमित्त मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांना बेळगाव विमानतळ किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हींचा अपव्यय होत आहे. सध्या विमानसेवा पुरवणार्या टू जेट या कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कोल्हापूर मुंबई विमानसेवेचा बोजवारा उडाला असून सक्षम सेवा पुरविणाऱ्या कंपनीमार्फत सदर मार्गावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी विनंती वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर यांचेमार्फत आज निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी मार्फत प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी वंचित बहुजनने दीला आहे,निवेदन कोल्हापूर विमानतळ संचालक कमलकुमार काटारिया यांना दिले .यावेळी आघाडीचे भिमराव आनंदा गोंधळी करवीर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, कृष्णात रेवडे, अर्जुन कांबळे शाखा अध्यक्ष, प्रल्हाद गोंधळी, संदीप गोंधळी उपाध्यक्ष, संतोष कांबळे सेक्रेटरी,अमर कांबळे, उपस्थित होते .









