बेळगाव रेल्वे स्थानकावरून बिदर व हैदराबाद या दोन शहरांना रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगाव मधून बिदर व हैदराबाद या दोन्ही शहरांना एक्सप्रेस रेल्वे सुरू करावी अशी मागणी बेळगाव मधील जेष्ठ नागरिकांनी गुरुवारी निवेदनाद्वारे खासदार मंगला अंगडी यांच्याकडे केली. बेळगाव बिदर रेल्वे सेवा सुरू झाल्यास बिदर शहराला जाणाऱ्या प्रवाशांसोबतच बनशंकरी, गुलबर्गा व गंगावती येथे पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. बेळगाव मधून शेकडो भाविक बनशंकरी देवस्थानला भेट देत असतात. त्यामुळे या प्रवाशांची सोय होईल असे निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊनपूर्वी बंद झालेली कोल्हापूर- हैदराबाद रेल्वे अडीच वर्षे उलटले तरी अद्याप बंदच आहे. बेळगाव शहरातील शेकडो विद्यार्थी हैदराबाद येथे शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक जण आयटी कंपन्यांमध्ये नोकरीही करीत आहेत. त्यांना येण्या-जाण्यासाठी खाजगी बसचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे बेळगाव- हैदराबाद या मार्गावर एक्सप्रेस सुरू केल्यास विद्यार्थी व नोकरदारांची सोय होईल.
खासदार मंगला अंगडी यांनी निवेदन स्वीकारून आपण रेल्वे बोर्ड कडे हे निवेदन पाठवून देऊ असे आश्वासन दिले.यावेळी जी.के. कुलकर्णी, एम. के. कुलकर्णी यासह इतर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









