शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : एपीएमसी मार्केट परिसरातच फळ मार्केट, चिंच मार्केट व भाजी मार्केट सुरू करावे, अशी मागणी कर्नाटक रयत संघाच्यावतीने करण्यात आली. सध्या एपीएमसी, फळ मार्केट व भाजी मार्केट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे नियंत्रण ठेवण्यासोबतच महामार्गाच्या शेजारी वाहतूक कोंडी होत असल्याने हे सर्व मार्केट एकत्रित केल्यास शेतकऱ्यांचाही लाभ होणार असल्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शेतकरी तसेच एपीएमसी व फळ विक्रेत्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली. जयकिसान या खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. 10 ते 12 रुपये कमिशन शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी सर्व मार्केट एकाच ठिकाणी सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी चुन्नाप्पा पुजारी तसेच व्यापारी उपस्थित होते.









