आमदार जित आरोलकर यांचे आवाहन, मांद्रेतील जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन
वार्ताहर/हरमल
पेडणे तालुक्मयात झोनींग प्लान म्हणजे विध्वंस असून सामान्य लोकांचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. प्रत्येक गांवातील जमिनी बाहेरील लोकांसाठी अधोरेखित केल्या असून सामान्य लोकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी गांव व तालुक्मयाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी पुढील लढ्यास सहकार्य करावे, असे आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी केले. मांद्रे भाऊसाहेब बांदोडकर उद्यानात आयोजित जाहीर सभेत आमदार जित आरोलकर मार्गदर्शन करीत होते. झोनींग प्लान ठरवण्यासाठी,तालुक्मयातील प्रत्येक पंचायतींना पाठवून ग्रामस्थाना खुला करणे आवश्यक होते,नागरिकांच्या सूचना,हरकती घ्यायला हवेत.मात्र टीसीपी खात्याने बेकायदेशीरपणे प्लॅन निश्चित केला व लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न आहे.तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडण्यातील जनतेने साथ द्यावी व लोकलढा यशस्वी करूया.मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सोमवारपर्यत निर्णय काळवण्याचे मान्य केले असून,जर का निर्णय न आल्यास मंगळवारपासून गावागावांत जाहीर सभा सुरू करण्याचा निर्णय ठाम असल्याचे आमदार आरोलकर यांनी सांगितले.यापुढील लढा पेडणे बचाव अभियान ह्या नावाने सुरू राहील असे आमदार जित आरोलकर यांनी सांगितले. पेडण्याचे आमदार निद्रिस्त आहे,मात्र पेडणे मतदारसंघातील बरेचसे मतदार लोक उपस्थित असल्याने सर्वांनी साथ द्यावी.
नागरिकांनी लढ्याला पाठिंबा द्यावा : अॅड. रमाकांत खलप
मांद्रे व पेडण्यातील जनतेने झोनींग प्लान रद्द करण्यासाठी जो लढा उभारला त्यासाठी सर्वांचे कौतुक आहे. कुळांना मालकी हक्क दिली असता, त्यांना ती विकण्याची मोकळीक नव्हती. ह्या सरकारने ती मागणी धुडकावून लावली,त्यामुळे ह्या लढ्यात नागरिकांनी सामावून घ्यावे, असे आवाहन माजी केंद्रीयमंत्री एŸड रमाकांत खलप यांनी केले.
प्रक्रिया पूर्णत रद्द करावी : सरपंच सावंत
मांद्रे व पेडण्यासाठी असलेला झोनींग प्लान पूर्णत एक घोटाळा असून,जनता खपवून घेणार नाही.मंत्री राणे याना मंत्रिमंडळातून वगळावे व मांद्रेत येऊन नागरिकांना विश्वासात घ्यावे.मांद्रेतील माजी आमदारांनी ह्या लढ्यात भाग घ्यावा असे आवाहन मांद्रेचे सरपंच एŸड अमित सावंत यांनी सांगितले. भाजपाने झोनींग प्लॅनबाबत विश्वासात घेणे आवश्यक आहे.गोव्याचा दोन नंबर मंत्री असलेल्या राणे यांनी दोन नंबर कामे करू नये.आरोग्य क्षेत्रातील धुडगूस संपता संपेना,अश्या मंत्र्यांनी प्लान पूर्णत रद्द करण्याची आमची दृढ मागणी असल्याचे सुदेश सावंत यांनी केली व सरकारवर कडाडून टीका केली.
मांद्रेचा लढा पूर्णत गोव्यात पोचणार असे वाटत आहे व गोमंतकीय लोकांनी पाठिंबा द्यावा.मंत्री विश्वजित राणे यांनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर याना घेऊन फिरले.मात्र मांद्रेत येऊन तुम्हाला शक्मय होणार नाही. मांद्रे म्हणजे सत्तरी व वाळपई नसून, मांद्रेतील जनता सुशिक्षित असून चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी प्रयत्न आहे.विश्वजित मांद्रेला जित करून देणार नाही, मात्र आमदार जित निश्चितच जित करून देणार आहे. मंत्र्यांना आमदार जित आरोलकर यांचे घर पाडावयाचे असल्यास, त्यानी मांद्रेतील जनतेची घरे पाडावी लागतील, अशी खरमरीत टीका पंच प्रशांत नाईक यांनी आवेशपूर्ण भाषणातून केली. यावेळी राजन कोरगावकर, इनासियो डिसौझा, दीपक कळंगुटकर, संदेश सावंत आदींची भाषणे झाली. प्रारंभी आमदार जित आरोलकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व सभेला प्रारंभ झाला. सुत्रनिवेदन व आभार एŸड प्रसाद शहापूरकर यांनी केले.सभेला 3 हजाराच्या आसपास जनता होती.पेडणे पोलिसांनी यावेळी वाहतूक सुरळीत होण्यास साहाय्य केले. आजच्या ह्या जाहीर सभेस हरमल पंचायतीचे सर्व पंच सदस्य उपस्थित राहिल्याने त्यांचे अभिनंदन असल्याचे आमदार जित आरोलकर यानी नमूद केले. ह्या सभेस नागरिक शांततेत सहभागी झाले मात्र माजी केंद्रीयमंत्री खलप व गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलांगुटकर यांच्या भाषणात व्यत्यय आल्याने,त्यांना भाषण आवरते घ्यावे लागले. सभा चालू असताना ,जित तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आमदार जित आरोलकर यांनी आपला जयजयकार करू नये,त्यासाठी पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा जयजयकार करण्याचे आवाहन केले.









