विक्रेता संघटनेचे आ. विनय कोरेंना निवेदन
वारणानगर / प्रतिनिधी
शासनाने मुंद्राक विक्रेत्यांवर हातोडा मारत शंभर,पाचशेचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे मुद्रांक शासनाने बंद करू नयेत, अशी मागणी पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील मुद्रांक संघटनेने केली असून याबाबत आमदार डॉ. विनय कोरे यांना वारणानगर येथे निवेदन दिले आले.
निवेदनात म्हटले आहे, शासनाने १०० व ५०० रुपयाचे मुद्रांक बंद झाल्यास यावर उपजीविका असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच प्रचलित असलेली मुद्रांक विक्री प्रणाली सुलभ आहे. त्यामुळे खेडोपाडी च्या नागरिकांना स्टॅम्प जलद उपलब्ध होतात, पण तेच जर बँकेतून दिले, तर ते बँकेच्या वेळेतच मिळणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोड लागेल असे निवेदनात म्हटले आहे .
प्रचलीत असलेली मुद्रांक विक्री प्रणाली कायम ठेवावी. जर शासनाला फ्रेंकिंगद्वारे मुद्रांक विक्री सुरू करायची असेल तर मुद्रांक विक्रेत्यांलाच फ्रेंकिंग मशिन मिळावेत. आमदार कोरे यांनी मागण्यांबाबत मंत्रालयाशी पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मुद्रांक विक्रेता संघांचे सदस्य शंकरराव यादव, अनिल बनकर, महेंद्र शिंदे, राजेंद्र दळवी, विजय कुराडे, राजेंद्र डोंगरे यांच्यासह पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील मुद्राक विक्रते उपस्थित होते.









