Korea Embassy India : प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचा RRR या चित्रपटातील नाटु-नाटु या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला.एवढेच नाही तर जगभरातील लोकांना ही याची भुरळ पडली आहे.नुकतेच भारतातील दक्षिण कोरिया एम्बेसीच्या स्टाफने य़ा गाण्यावर डान्स केला आहे.भारतातील कोरियाच्या दूतावासाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रिट्विट करत कौतुक केले आहे. चैतन्यशील आणि मोहक सांघिक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
नेमक काय आहे ट्विट
तुम्हाला नाटू माहित आहे का?
कोरियन दूतावासाचे Naatu Naatu नृत्य कव्हर तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. दूतावासाच्या कर्मचार्यांसह कोरियन राजदूत चांग जे-बोक पहा नाटू नाटू!!
भारतातील दक्षिण कोरिया एम्बेसीच्या स्टाफलाही नाचण्याचा मोह आवरला नाही.सोबतच कोरियन राजदूत चांग जे-बोक हे देखील या गाण्यावर थिरकले आहेत.नुकताच नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. Korea Embassy India या ट्विटर अकौंटवरून व्हिडिओ ट्विट केला आहे.
कोरिया नाटू नाटू डान्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा- कोरियन राजदूत चांग जे-बोकसह एम्बेसीच्या स्टाफलाही चढला नाटु-नाटुचा फिव्हर
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









