हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित हनुमान चषक शहर आंतरशालेय 14 वर्षाखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल आणि लव्हडेल हायस्कूल संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. अनुश गौडा व अंश अपलदिनी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने नोबेल इंग्लिश स्कूल चिंचणी संघावर 189 धावानी विजय संपादन केला. सेंट झेवियर्स हायस्कूलने 20 षटकात 2 बाद 216 धावा केल्या. त्यात अनुष गौडाने 16 चौकारासह 111 करून शतक झळकविले. इंदर प्रजापतीने 3 चौकारांसह 35, अऊष काळभैरवने 20 धावा केल्या. नोबलतर्फे तौकिर देसाईने 1 गडी बाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना नोबेल इंग्रजी स्कूल चिंचणीचा डाव 12 षटकात सर्वबाद 27 धावात आटोपला. त्यात मछार आशीने 13 धावा केल्या. झेवियर्सतर्फे चेतन प्रजापतीने शून्य धावांत 4, अऊष काळभैरव व परीक्षित वांडकर यांनी प्रत्येकी 2 गडी, तर यश चौगुले व इंदर प्रजापती यांनी प्रत्येकी 1 बाद केले.
दुसऱ्या सामन्यात लव्हडेल हायस्कूल संघाने महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल संघावर चुरशीच्या लढतीत 13 धावांनी विजय संपादन केला. लव्हडेल हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात सर्वबाद 108 धावा केल्या. त्यात अजय लमानीने 1 षटकार व 6 चौकारांसह 40, वेदांत बजंत्रीने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूलतर्फे आराध्या बेळगावकरने 18 धावांत 4, संकेत नाकाडीने 2, अद्वेत बेळगावकर, रजत शंभूचे, सुरेश बादस्कर, अथर्व पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूलने 20 षटकात 8 गडी गमावून 95 धावा केल्या. त्यात प्रसन्ना शानभागने 6 चौकारासह 54 धावा केल्या. लव्हडेल स्कूलतर्फे अंश अपलदीनी व संप्रीत हांजी यांनी प्रत्येकी 2 तर अजय लमाणी, अमित अष्टगी यांनी एकेक बळी टिपला.









