प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघाचे प्रतिष्ठित सरचिटणीसपद पटकावल्यामुळे सेंट झेवियर्सच्या प्रशासकाने म्हापसा (गोवा) येथील सेंट झेवियर्स कॉलेजच्या निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या शपथविधीला जाणीवपूर्वक उशीर केला. गोवा विद्यापीठाच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होऊन 75 दिवस उलटले आहेत. त्यामुळे सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासनाने निवडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी होणारा भेदभाव थांबवावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उत्तर गोवा सचिव निकीता पार्सेकर यांनी काढलेल्या पत्रकात केली आहे.
शनिवारी एबीव्हीपीचा निषेध शांततापूर्ण होता आणि निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी केलेल्या असंख्य विनंत्या सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासनाच्या कानावर पडल्यानंतरच, त्यांनी दोन महिन्यांहून अधिक काळ कोणतेही विनंतीपत्रास हरकत घेतली. अभाविपने महाविद्यालयाची विद्यार्थी परिषद त्वरित स्थापन करण्याची मागणी केली अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या म्हापसा युनिटला पक्षपाती महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू ठेवण्यास भाग पाडले जाईल.
विद्यार्थी मंडळ कोणत्याही तक्रारिंसाठी विद्यार्थ्यांचा कणा बनते आणि विद्यार्थी या संस्थेकडे त्यांची प्रतिभा मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पाहतात. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका योग्य पद्धतीने झाल्या नाहीत. 2020 मध्ये, हे समजण्यासारखे होते कारण कोविड-19 मुळे पॅम्पस बंद करण्यात आले होते. 2021-22 च्या तुकडीसाठी, निवडणुका पार पडल्या परंतु त्यामध्ये खंडित प्रक्रिया होती. यावषी (2022-23) निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सर्व पदांची निवड झाली. मंडळात अभाविपचे साहिल महाजन विजयी झाले. मात्र, तब्बल 2 महिने उलटूनही शपथ सोहळा झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब गंभीर आहे.
21 जानेवारी 2023 रोजी साहिल महाजन आणि परिषद सदस्यांनी प्राचार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. विद्यार्थी पॅम्पसमध्ये जमले आणि त्यांनी विरोध सुरू केला आणि विद्यार्थी मंडळ त्वरित स्थापन करण्याची मागणी केली. शांततापूर्ण आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला मात्र प्रशासनाने विद्यार्थ्यांना धमक्मया देऊन तेथून निघून गेले. तालुक्मयाच्या मामलेदार व पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत नेल्याने आता पुढील बैठक मंगळवारी 24 जानेवारी 2023 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे, असेही पार्सेकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘सेंट झेवियर’मधील तणाव मुख्यमंत्र्यांच्या संगनमतामुळे ‘एनएसयूआय’कडून गंभीर आरोप
म्हापशातील सेंट झेवियर महाविद्यालयात शनिवारी निर्माण झालेला तणाव हा पूर्वनियोजित कट आहे. ही घटना घडनामागे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाच हात असून, त्यांच्या संगनमतामुळेच ही घटना घडली आहे आहे, असा गंभीर आरोप नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
विद्यार्थी मंडळ स्थापनेचा विषय हा त्या महाविद्यालय व्यवस्थापनाचा निर्णय आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही गुंडागिरी करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात गोंधळ घातला. शिक्षण संस्थेसारख्या ठिकाणी प्राचार्य व प्राध्यापकांशी केलेले गैरवर्तन हे निषेधार्ह आहे. कारण विद्यार्थी नसलेल्या ‘अभाविप’च्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य आणि प्राध्यापकांशी घातलेला वाद व हुज्जत ही शिक्षण खात्याला धक्का देणारी घटना आहे, असेही एनएसयूआयचे म्हणणे आहे.
पणजीतील आझाद मैदानावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ‘एनएसयूआय’चे गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी, कुडतरीचे गटाध्यक्ष शेन रिबेलो, कुंकळीचे गटाध्यक्ष दयेश सावंत उपस्थित होते.
सेंट झेवियर्स महाविद्यालयात घडलेली घटना ही म्हादईच्या मुख्य विषयावरून लक्ष विचलीत करण्यासाठी रचलेला कट आहे. म्हादईचा विषय कुठेतरी थांबावा आणि लोकांचे लक्ष विचलित व्हावे, यासाठीच ही कृती झाली असल्याचा आरोप एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.








