क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
फिनिक्स स्कूल आयोजित फाउंडर वीक निमित्त फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी सेंट झेवियर, एम व्ही एम, जनक मेमोरियल, कॅन्टोनमेंट, इस्लामिया संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना मात करून विजय सलामी दिली.फिनिक्सच्या मैदानावरती खेळवण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे सिद्धरामेश्वर कॉलेजचे प्राचार्य सिद्धाराम रे•ाr, युवराज पावले आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात सेंट झेवियरने अंगडी संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 8, 14, 18 व्या मिनिटाला झेवियरच्या मन्मद माहीद भडकली याने 3 गोल केले दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला भडकलीच्या पासवर रोशन अब्बासने गोल करून 4-0 असा विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. एम ने विजया संघाचा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात आर्यनने पाच गोल करीत स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक सह 5 गोल केले. स्वप्निल, आऊष, ध्रुव यांनी प्रत्येकी एक गोल केला.तिसऱ्या सामन्यात कनक मेमोरियलने भातकांडे स्कूलचा 7-0 असा पराभव केला. या सामन्यात कनक मेमोरियलच्या वीराप्पाने हॅटट्रिकसह 4 गोल केले. गणेश, राहील, शिवराज यांनी प्रत्येकी एक गोल केला
चौथ्या सामन्यात कॅन्टोनमेंटने सेंट पॉल्सचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले त्यामुळे गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 29 व्या मिनिटाला कॅन्टोनमेंटच्या अनिकेत च्या पास वर शानुर रिपो रेपोडी याने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सेंट पॉल्सने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
पाचव्या सामन्यात इस्लामियाने शेख सेंट्रलचा 4-0 असा पराभव केला. त्या सामन्यात इस्लामियाच्या 12 व 17 व्या मिनिटाला रिहानने सलग दोन गोल केले. इस्लामियाने 2-0 पहिल्या सत्रात आघडी घेतली. दुसऱ्या सत्रात 27 मिनिटाला अब्दुलने तर 32 व्या मिनिटाला सादने त्यांनी प्रत्येकी गोल केला.14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात सेंट पॉल्स ने भातखंडेचा 6-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात ज्योती सेंट्रल संघाने शेख सेंटर संघाचा 2-0 चा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात कनक मेमोरियल संघाला फिनिक्स संघाने गोल शून्य बरोबरीत रोखले. चौथ्या सामन्यात संजय घोडावत संघाने भरतेशचा 2-0 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात सेंट झेवियर्सने एम व्ही एमचा 4-0 असा पराभव केला.









